Home

Wednesday, 18 February 2015

दैनिक लोकमत

पंढरपूर रेल्वेला शयनयान सुविधा

परभणी : निजामाबाद- पंढरपूर जाणार्‍या पॅसेंजर रेल्वेगाडीला १९फेब्रुवारीपासून एक शयनयान सुविधा असणारा कोच जोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागाचे अतिरिक्त वाहतूक प्रबंधक ब्रिजेश रॉय यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. त्यामुळे प्रवाशांची चार वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होत आहे.
निजामाबाद- पंढरपूर रेल्वेगाडीला प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांकरीता एक शयनयान सुविधा असणारा कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडीची डब्यांची संख्या १२ होणार आहे. सदरील रेल्वेला स्लीपर सुविधा देण्यासाठी चार वर्षापासून मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने मागणी केली होती. 
वेळोवेळी निवेदन देण्यात आल्यानंतर ही सुविधा मिळणार आहे. या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मध्यरेल्वे विभागाचे वाहतूक प्रबंधक सुनिल वर्मा, ब्रिजेश रॉय, प्रभाकर निनावे यांनी केले आहे. /(प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment